कोकण

बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या, बोकडाचा मृत्यू

CD

बिबट्याच्या हल्ल्यात
बकऱ्या, बोकडाचा मृत्यू
चिपळूण, ता. १८ः रामपूर बौद्धवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या अन् एका बोकडाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. १७)सकाळी दहाच्या दरम्यान घडला.
तालुक्यातील विविध भागात बिबट्याने मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरे तसेच ग्रामस्थांवर हल्ला केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. तोंडली येथे बिबट्याने ग्रामस्थावर केलेल्या हल्ल्यात बिबट्याचाच मृत्यू झाला. तोंडली येथील दीड वर्षे वयाची मादी होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी करून खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर रामपूर बौद्धवाडी येथेही बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये शेतकरी अतिश अरुण जाधव यांच्या पाच बकऱ्या, एक बोकड फस्त केला. बौद्धवाडी पाठीमागील रानात बिबट्याने बकऱ्यांचे लचके तोडले. घटनास्थळी वनधिकारी राजाराम शिंदे, पोलिस पाटील दीप्ती जाधव यांनी पंचनामा केला. या घटनेत जाधव यांचे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. नुकसान भरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने राहिल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. माजी सरपंच स्मिता जाधव यांच्या वाड्यात येऊन बिबट्याने रात्री गाईचे वासरूदेखील मारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT