52048
जि. प. संकुलाचा
कायापालट करू
रवींद्र खेबुडकर ः सीईओ पदाची सूत्रे हाती
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १८ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सुरू असलेले शासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे कसे करता येईल व जिल्हा परिषद परिसर सुशोभिकरणातून जिल्हा परिषद संकुलाचा कायापालट करण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. त्यासाठी प्रत्येक खाते प्रमुख व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे ही अपेक्षा आहे. यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी आज प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला. खेबुडकर म्हणाले, ‘‘मी या जिल्ह्यात यापूर्वीही काम केले आहे. अनेक वर्षांनंतरही जिल्हा परिषद भवन आणि त्या परिसरात सुधारणा झालेली दिसून येत नाही. अनेक समस्या आजही आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद परिसर सुशोभीकरणाबरोबरच या संकुलाचा कायापालट करण्यासाठी माझे प्राधान्याने प्रयत्न राहतील. जिल्हा परिषद शासकीय कामकाज अधिक प्रभावीपणे व्हावे, यासाठी प्रत्येक खाते प्रमुखांनी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे, ही अपेक्षा आहे. त्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.’’
-----
बंद सीसीटीव्ही कार्यन्वित करणार
ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांना अपेक्षित असलेले काम जिल्हा परिषदेमार्फत करण्याचा प्रयत्न राहील. शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वाच्या क्षेत्रात अधिक दर्जेदार काम होण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हा परिषद प्रशासकीय कारभार जलद गतीने व प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक ते उपाय योजले जातील. बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा लवकरच कार्यान्वित केली जाईल. प्रत्येक कर्मचाऱ्याने कामाच्या वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असून त्यावर नियंत्रण ठेवले जाईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.