-rat१८p४१.jpg-
P२५N५२०३९
रत्नागिरी ः जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी.
-----
प्राथमिक शिक्षकांची रत्नागिरीत धरणे
शासननिर्णय रद्द करा ; हजारो शिक्षक ठरणार अतिरिक्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करा. या निर्णयामुळे भविष्यात शाळेत शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
सरकारच्या शिक्षकविरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणा देत आज प्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. १५ मार्च २०२४ च्या शासननिर्णयाने संचमान्यता निश्चित करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने सहावी व सातवीची पटसंख्या २० किंवा २० पेक्षा कमी असेल त्यांना १ नियमित शिक्षक मंजूर केला आहे. ही गोष्ट शिक्षण हक्क कायद्याला विसंगत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने निवेदनाद्वारे केला आहे. शिक्षण कायद्यातील तरतुदीच्या व २८ ऑगस्ट २०१५ च्या विसंगत अशा निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाहीत. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या वेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, संतोष पावणे, राजेश शिर्के, अरविंद जाधव, पंकज जोशी, अंजली धामापूरकर आदी उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.