rat18p43.jpg
52053
मुंबईः माजी आमदार संजय कदम यांचे शिवसेनेत स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. शेजारी राजन साळवी, योगेश कदम, रामदास कदम आदी.
----------
माजी आमदार संजय कदम शिवसेना शिंदे गटात
शिवसेना उपनेतेपदी निवड; पक्षप्रवेशाचा मुंबईत सोहळा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १८ : दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी मंगळवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे झाला. या वेळी पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, शिवसेना नेते रामदास कदम, माजी आमदार राजन साळवी आदी उपस्थित होते.
माजी आमदार संजय कदम यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे दापोली विधानसभा मतदार संघातील अनेक राजकीय गणिते बदलली असून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. संजय कदम यांच्या या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील चित्र हे बदलणार आहे. यापुढे या मतदारसंघात शिवसेनेला अधिक बळ मिळणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने माजी आमदार कदम यांच्यासोबत त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार संजय कदम यांची शिवसेना उपनेतेपदी निवड करण्यात आली असून तसे नियुक्तीपत्र त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.