५२०७१
उड्डाण पुलाची संरक्षित
जाळी अडकली ट्रकमध्ये
महामार्गावर बाका प्रसंग ः चालकाचे प्रसंगावधान
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामातील हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम करताना सुरक्षेसाठी लावलेली जाळी मार्गावरून जाणाऱ्या ट्रकला अडकल्याने बाका प्रसंग ओढवला. वाहनचालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला आहे. घटनेच्या वेळी पुलावर तीन ते चार कर्मचारी काम करत होते. ट्रकचालकाने प्रसंगावधान राखून वेळीच ट्रक थांबवल्याने अपघात टळला आहे.
शहरातील बहादूरशेखनाका येथे १६ ऑक्टोबर २०२३ ला उड्डाणपूल कोसळला होता. या अपघातात अनेक जण बालंबाल बचावले होते. त्यानंतर उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदारास कंपनीस सुरक्षितता बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन्ही बाजूस संरक्षक जाळी उभा करून काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही महामार्गावर अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहरातील उड्डाण पुलाचे काम गतीने सुरू आहे. या कामात सुरू असलेला हलगर्जीपणा आजच्या प्रसंगाने समोर आला आहे. काम करताना लावलेली जाळी एका ट्रकला अडकल्याचा प्रकार घडला. ट्रकचालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ट्रक थांबल्यानंतर अडकलेली जाळी काढल्यानंतर ट्रकचालक मार्गस्थ झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.