ratchl१८३.jpg
52072
चिपळूणः भगवान कोकरे यांना गोशाळेच्या अडचणी सोडवण्याचे पत्र देताना द. शं. सोनावले.
-------------
उपोषण मागे घेण्याचे पत्र कोकरे यांनी धुडकावले
हवे ठोस पाऊल; अडचणी सोडवण्याची कार्यवाही सुरू हे अमान्य
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ः गोशाळेच्या अडचणी सोडवण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, असे पत्र जिल्हा पशुसंवर्धनचे उप आयुक्त डॉ. द. शं. सोनावले यांनी मंगळवारी उपोषणकर्ते भगवान कोकरे यांना दिले आहे. मात्र ठोस कार्यवाही होत नाही, तोवर माघार घेणार नसल्याचे कोकरे महाराजांनी सोनावले यांना सांगितले.
गोशाळेचे मंजूर २५ लाखाचे अनुदान तत्काळ मिळावे. गोशाळेला व्यावसायिक दराने होणारा वीज पुरवठा शेतीप्रमाणे आकारण्यात यावा. गोशाळेच्या जागेचा प्रश्न शासनाने सोडवावा आदी मागण्यांसाठी कोकरे हे सोमवारपासून गोशाळेतच उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला महाराष्ट्र राज्य वारकरी सांप्रदाय संघटनेसह विविध संघटनांना व ग्रामस्थांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
मंगळवारी उप आयुक्त सोनावले यांनी कोकरे यांची भेट घेऊन त्यांना पत्र दिले आहे. त्यात आपल्या गोशाळेतील देशी गाईंच्या पालन पोषणासाठी प्रतीदिन प्रती गाय ५० रूपये अनुदान योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे पाठविला आहे. आपल्या गोशाळेतील अनुदान पात्र देशी गाईची संख्या ७४४ असून शासन निर्णयानुसार जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ च्या कालावधीसाठी आपल्या संस्थेस ३३ लाख ४८ हजार इतकी मागणी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे केली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग औंध पुणे यांच्याकडेही कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर केला आहे.
तसेच गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत देय असलेला २५ लाख रूपयांचा हप्ता गोशाळेच्या जागेचा प्रश्न मार्गी लागताच अदा करण्यात येईल, असे नमूद केले आहे. मात्र तोपर्यंत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.