वायरी वराडकरवाडीतील
चोरीप्रकरणी दोघे अटकेत
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १८ : वायरी वराडकरवाडी येथील भूषण साटम यांच्या घरी चोरी केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अखेर तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सुमित केशव हांडे (रा. बाजारपेठ, मालवण) व सर्वेश सुनील बागवे (रा. धुरीवाडा, मालवण) या दोघांना अटक केली. त्यांना उद्या (ता. १९) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
यातील तिसरा संशयित असलेला प्रसाद (पूर्ण नाव माहिती नाही, रा. कुंभारमाठ) हा पसार झाला आहे. साटम यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी रात्री १०.४० ते १२.१५ या वेळेत वायरी वराडकरवाडी येथील राहत्या घरात खिडकीद्वारे संशयित तिघा युवकांनी प्रवेश करून घरातील लॅपटॉप, चार्जर, माऊससह, सॅक, गॉगल असे सुमारे ४० हजार २०० रुपयांचे साहित्य चोरले. तसेच लेडीज पर्समधील रोख २० हजार रुपये पळविले. या फिर्यादीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार चांदोसकर हे करीत आहेत. तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू असून लवकरच त्यालाही ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.