कोकण

बेकायदेशीर रस्त्याच्या कामाला स्थगिती न दिल्यास आंदोलन

CD

बेकायदेशीर रस्त्याच्या कामाला
स्थगिती न दिल्यास आंदोलन

योगेश तांडेल ः पालकमंत्र्यांना दिले निवेदन

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १९ ः पालकमंत्री नीतेश राणे यांचे जनता दरबारातील आदेश धुडकावून जिल्हाधिकारी यांच्या नावे केलेल्या संमतीपत्रांसह बोगस कागदपत्रांच्या आधारे केल्या जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला २४ मार्चपर्यंत स्थगिती न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी दिला आहे.
याबाबत पालकमंत्री राणे यांच्यासह जिल्हाधिकारी यांना तांडेल यांनी निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील खानोली कोंडुरा ते येरम लिंगाचे देवालय या नियमबाह्य व बेकायदेशीर रस्त्याबाबत पाच-सहा वर्षांपासून आपण प्रशासनाचे लक्ष वेधून घेत आहे. या बेकायदेशीर रस्त्याच्या कामाबाबत कोणतीही कायदेशीर कारवाई होत नसल्याने २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्या अनुषंगाने पालकमंत्री राणे यांनी ओरोस येथे २५ जानेवारीला घेतलेल्या जनता दरबारामध्ये महसूल उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे बैठकीचे आयोजन केले होते; मात्र नियोजित बैठकीबाबत बांधकाम विभागाकडून २० फेब्रुवारीला सायंकाळी व्हॉट्सअॅपवर पत्र पाठवण्यात आले. परंतु मी तालुका औद्योगिक ग्रामोद्योग सहकारी संस्थेचा चेअरमन असल्याने व २१ फेब्रुवारीला संस्थेची पहिलीच नियोजित सभा त्याच दिवशी सकाळी ११ वाजता असल्यामुळे तहसीलदार कार्यालय येथे २१ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

खलनायक ते राजकारणी: ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा प्रवास थांबला; 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT