तेलुगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे दीर्घ आजाराने निधन झालय. रविवार पहाटे 4 वाजता हैदराबाद इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने केवळ तेलुगूच नाही, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जातेय.