-rat२४p१५.jpg-
P२५N५३१६३
रोहा ः येथे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त गरजूंना संस्थानाच्यावतीने ब्लँकेट कीटचे वाटप करण्यात आले.------------
रोहा येथे गरजूंना ब्लॅंकेट वाटप
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा रोहा (जि. रायगड) येथे पार पडला. या वेळी संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन उपक्रमांतर्गत ४०० गरजूंना ब्लॅंकेट कीटचे वाटप करण्यात आले.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांच्या सिद्ध पादुकांचे रोहा येथे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सिद्ध पादुकांची रायकर पार्क नगर पालिका ते गौळवाडी मैदान अशी मिरवणूक काढण्यात आली. गौळवाडी मैदानावर दर्शन सोहळा झाला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते गरजूंना ब्लँकेट कीट वाटप करण्यात आले. या कीटमध्ये उशी, चादर, चटई यांचा समावेश आहे. अशी ४०० कीट वितरित केली गेली. मोलमजुरी करणाऱ्या तसेच हातावर पोट असणाऱ्या गरजूंची नेमकी प्राथमिक आवश्यकता ओळखून संस्थानाने केलेल्या या मदतीबद्दल लाभार्थ्यांनी आभार मानले. या वेळी रोह्याचे माजी नगराध्यक्ष लालता कुशवाह, ओबीसी जिल्हाध्यक्ष सुरेश मगर, ओबीसी रोहा तालुकाध्यक्ष अनंत थिटे, तंटामुक्ती अध्यक्ष मोरेश्वर त्ररिवले आदी मंडळी उपस्थित होती.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.