कोकण

देवगड हायस्कूलमध्ये ''ना. द. कामत'' कक्ष

CD

swt2431.jpg
53242
देवगड : येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या वर्गखोलीच्या नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले.

देवगड हायस्कूलमध्ये ना. द. कामत कक्ष
वर्गखोलीचे नामकरणः मान्यवरांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २४ : येथील शेठ म. ग. हायस्कूलमधील ''ना. द. कामत कक्ष'' या वर्गखोलीच्या नामकरण फलकाचे अनावरण विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
येथील देवगड एज्युकेशन बोर्डाचे माजी अध्यक्ष (कै.) नारायण कामत यांचे पुत्र मृणाल कामत, कन्या प्रियवंदा रेगे, रश्मी नाडकर्णी, दीपक नाडकर्णी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. तसेच दुसऱ्या वर्गखोली नामकरण फलकाचे उद्घाटन संयुक्त देणगीदार (कै.) श्रीकांत देसाई यांचे भाचे दत्तात्रय खानविलकर, देणगीदार शोभना कार्लेकर यांचे प्रतिनिधी लक्ष्मण येरम यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समिती उपाध्यक्ष अर्चना नेने, सदस्या अनुश्री पारकर, स्थानीय समिती खजिनदार दत्तात्रय जोशी, सदस्य मिलिंद कुबल, विलास रुमडे, माजी मुख्याध्यापक नारायण माने, मुख्याध्यापक महादेव घोलराखे आदी उपस्थित होते.
यावेळी मृणाल कामत यांनी, माझ्या वडिलांनी काम केलेल्या संस्थेला देणगी दिल्याबद्दल अभिमान वाटतो, असे सांगितले. रश्मी नाडकर्णी आणि प्रियवंदा रेगे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला. श्री. शिंगाडे यांनी सर्व देणगीदारांचे शाळा आणि संस्थेच्या वतीने आभार मानले. दत्तात्रय जोशी यांनी देणगीबद्दल समाधान व्यक्त केले. लक्ष्मण येरम यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व देणगीदारांचा परिचय माने यांनी करून दिला. प्रास्ताविक घोलराखे यांनी, सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक प्रवीण खडपकर यांनी केले. आभार पर्यवेक्षिका निशा दहिबावकर यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT