कोकण

-नैसर्गिक आपत्तीतील १ कोटी ४३ लाखाची प्रतीक्षा

CD

नैसर्गिक आपत्तीतील १ कोटी ४३ लाखांची प्रतीक्षा
रत्नागिरी, खेडमधील लाभार्थी ; ५९ लाख वितरित
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २५ : रत्नागिरीसह खेड तालुक्यात २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीतील नैसर्गिक आपत्तीतील मंजूर २ कोटी ३ लाख ६४ हजारांच्या नुकसान भरपाईपैकी दोन्ही तालुक्यात केवळ ५९ लाख ७१ हजार रुपयांचा मोबदला लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पाठपुरावा केला होता; मात्र उर्वरित १ कोटी ४३ लाख ९३ हजार रुपयांच्या नुकसान भरपाईची अद्यापही प्रतीक्षाच आहे.
अतिवृष्टीमध्ये रत्नागिरी तालुक्यासह खेड शहरातील व्यापारी, नागरिक आणि जगबुडी नदीकाठच्या रहिवाशांना मोठा फटका बसला होता. महसूल विभागाकडून नुकसानग्रस्तांचे रितसर पंचनामेही करण्यात आले. त्यानुसार रत्नागिरी तालुक्यातील नुकसानग्रस्तांना भरपाईपोटी ४३ लाख ८९ हजार ४५० रुपये तर खेड तालुक्यातील पूरग्रस्तांना १ कोटी ५९ लाख ७४ हजार ५७५ रुपयांच्या नुकसान भरपाईची आवश्यकता होती. दोन्ही तालुक्यांसाठी डिसेंबर २०२३ अखेर २ कोटी ३ लाख ६४ हजार रुपयांचा भरपाईपोटीचा मोबदला मंजूर झाला होता. त्यापोटी शासनाकडून रत्नागिरीसाठी १९ लाख ८५ हजार ५०० रुपये तर खेडसाठी ३९ लाख हजार ५०० रुपयांची भरपाई बाधितांना देण्यात आली. मोजक्याच नुकसानग्रस्तांना मोबदला वितरित करण्यात आला. उर्वरित बाधितांना भरपाईपासून वंचित राहावे लागले आहे. रत्नागिरीतील नुकसानग्रस्तांना २४ लाख हजार ९५० रुपये तर खेडमधील पूरग्रस्तांना १ कोटी १९ लाख ८९ हजार ५० रुपये भरपाई लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT