कोकण

कडवई येथील रखडलेले जोडरस्त्याचे काम सुरू

CD

- rat२५p८.jpg-
P२५N५३३१३
संगमेश्वर ः कडवई येथील जोडरस्त्याचे काम सुरू आहे.
----
कडवई येथील जोडरस्त्याचे काम सुरू
वाहनचालकांची गैरसोय दूर; तुरळ व्यापारी संघटनेचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २५ ः मुंबई-गोवा महामार्गावर कडवई येथे जोडरस्त्याचे काम रखडल्यामुळे वाहनचालकासह ग्रामस्थांची गैरसोय होत होती. याबाबत सातत्याने तक्रार केल्यानंतर आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नामुळे जोडरस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे सुरू असून, तुरळफाटा येथे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. महामार्ग व कडवईला जोडणारा रस्ता यामध्ये मोठा खड्डा तयार झाला होता. तेथे दगड व माती टाकून भराव करण्यात आला; परंतु हे काम काळजीपूर्वक न केल्यामुळे वाहनचालकांना गावातून महामार्गावर येताना त्रास सहन करावा लागत होता. काही वेळा तिथे अपघातही होत होते. भरावानंतर त्यावर रोज पाणी न मारल्यामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांना धुळीचा प्रचंड त्रास होत होता. या त्रासाला कंटाळून तुरळफाटा व्यापारी संघटनेने या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. नागरिकांची व व्यापाऱ्यांची होणारी गैरसोय चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित या कामात लक्ष टाकले. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने लगेचच कामाला सुरवात केली. या कामाचे काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. आमदारांनी या कामात लक्ष दिल्यामुळेच हे काम जलदगतीने सुरू झाले आहे. याबद्दल व्यापारी व वाहनचालकात समाधानाचे वातावरण आहे. काँक्रिटीकरण झाल्याने कडवईची वाहतूक चिखली व धामणाकवाडीमार्गे सुरू आहे. तरीही वाहनचालकांनी आठ दिवस सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामपंचायत कडवईच्यावतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

Cyber Crime: फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन विवाहीतेचा छळ; संग्रामपूरमध्ये धक्कादायक प्रकार

"आम्हाला आतातरी मूल नकोय" शुभविवाह फेम अभिनेत्रीचा खुलासा; कारण सांगताना म्हणाली..

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT