कोकण

ज्येष्ठांनी घेतला पर्यटन सहलीचा आनंद

CD

- rat२५p१०.jpg-
२५N५३३०६
रत्नागिरी ः कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सहलीत सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक.
---
ज्येष्ठांनी घेतला पर्यटन सहलीचा आनंद
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघ; कशेळी किनाऱ्याला भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः शहराजवळील कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे लांजा आणि राजापूर तालुक्यात ज्येष्ठांसाठी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक पर्यटन सहलीला ज्येष्ठ नागरिकांबरोबरच ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सहलीचे नेटके नियोजन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारूती अंबरे, उपाध्यक्ष राजेंद्र कदम आणि प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर कासेकर यांनी करून ज्येष्ठांचा आनंद द्विगुणित केला.
कडक उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेऊन आरामदायी वातानुकूलित बसची व्यवस्था केल्याने ज्येष्ठांचा प्रवास सुखावह झाला. लांजा तालुक्यातील आंजणारी नदीच्या काठावर निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री दत्तमंदिरात दर्शन घेऊन सहलीचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध गंगातीर्थ स्थानाला भेट देऊन गंगेचे दर्शन घेतले. श्री धूतपापेश्वर मंदिराचे नूतनीकरण आणि परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. तेथील दर्शनानंतर आडीवरे येथील श्री महाकाली मंदिराला भेट देण्यात आली. भारतातील प्रसिद्ध सूर्यमंदिर समजल्या जाणाऱ्या आणि लाकडी कोरीव कामाचा अप्रतिम नमुना असलेल्या कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिराला भेट देऊन देवस्थानचा प्राचीन इतिहास जाणून घेण्यात आला. तसेच कशेळी येथील सागरकिनाऱ्यावरील नव्याने पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असलेल्या सनसेट पॉईंटवर जाऊन ज्येष्ठ नागरिकांनी पर्यटनाचा आनंद घेतला. परतीच्या प्रवासात पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आणि गोळप येथील श्री गजानन मंदिरात दर्शन घेतले. दुपारी कशेळी येथील भक्तनिवासात ज्येष्ठांची भोजन आणि दुपारच्या विश्रांतीची व्यवस्था देवस्थान समितीने करून सहकार्य केल्याबद्दल वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूने फुंकले रणशिंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT