- rat२५p२२.jpg-
२५N५३३४२
राजापूर ः ‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ मोहिमेतील सायकलपटूंचे स्वागत करताना त्रिवेणी संघाच्या महिला आणि ग्रामस्थ.
---
‘महिला सायकलिस्ट’चे दळेत स्वागत
सुरक्षित तट, समृद्ध भारतमोहीम; गुजरात येथे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः देशाच्या किनारपट्टी भागातील सुरक्षा आणि समृद्धीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षादलाने आयोजित केलेल्या ‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ मोहिमेमध्ये सहभागी झालेले ७४ सायकलिस्ट आज दळे येथे दाखल झाले. त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. महिलांनी केलेल्या पुष्पवृष्टीने गुजराथ येथून आलेले सर्व सायकलिस्ट भारावून गेले होते.
देशाच्या किनारपट्टी भागातील सुरक्षा आणि समृद्धीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने ‘सुरक्षित तट समृद्ध भारत’ या मोहिमेचे आयोजन केले आहे. गुजरात येथे उद्घाटन झालेल्या या मोहिमेत ७० जवान आणि ४ महिला अशा ७४ सायकलिस्टचा समावेश आहे. हे सायकलपटू तालुक्यातील सागरी महामार्गावरील जैतापूर दळे येथे आले. त्यांचे त्रिवेणी संघाच्या महिलांनी औक्षण करत आणि पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत केले. या वेळी त्रिवेणी संघाच्या सहसचिव रेशम लाड, जैतापूर ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर यांनी मार्गदर्शनावेळी मोहिमेतील सर्व सहभागी सायकलपटूंचे कौतुक केले. या कार्यक्रमाला जैतापूर, दळे येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.