कोकण

जनसेवा समितीची सभा उत्साहात

CD

जनसेवा समितीची
सभा उत्साहात
रत्नागिरी ः शहरातील टिळक आळी, जोशी पाळंद, खालची आळी, वरची आळी, भुवड आळी, परटवणे, फगरवठार गाडीतळ येथील निवृत्त शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी वसंत झगडे यांच्या अध्यक्षतेखाली पतितपावन मंदिरात सभा उत्साहात झाली. याची सुरवात श्रींच्या प्रतिमेला हार घालून, श्रीफळ वाढवून करण्यात आली. गुलाबपुष्प देऊन मान्यवर आणि निवृत्त कर्मचारी यांचे स्वागत करण्यात आले. ज्यांच्या वयाला ७० वर्षे पूर्ण झाली असे विनय लांजेकर, गजानन संसारे, प्रकाश मांजरेकर, विकास मयेकर, श्रीकृष्ण खांडेकर, संपदा सावंत, सुरेखा डाफळे, यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित सभासदांनी विभागवार झालेल्या सभेत आपल्या अडचणी मांडल्या. सेवानिवृत्तांच्या समस्या सेवानिवृत्तांसाठी निर्गमित झालेले विविध आदेश, निवृत्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न या विषयी अध्यक्ष झगडे, विजय भाटकर, राजेंद्र रसाळ यांनी सखोल मार्गदर्शन केले. गेल्या १० वर्षात येथे न होऊ शकलेली सभा संयोजक अनंत नैकर आणि विजय भाटकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे यशस्वी झाल्याचे अध्यक्षांनी सुचित केले. या वेळी वरील परिसरातील सभासद उपस्थित होते.
---
डॉ. आंबेडकर वाचनालयाच्या
रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम
चिपळूण : बुरूमतळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. उद्या (ता. २६) रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्‍घाटन होणार आहे. पंचवीस वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष सुचय रेडीज व माजी आमदार रमेश कदम यांच्या सहकार्याने चिपळूण पालिका पुरस्कृत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची सुरवात झाली. आज ग्रंथालयाला शासनाने ब वर्ग दिला आहे. या वाचनालयामुळे बुरमतळी, पाग आदी भागातील वाचकांची सोय झाली आहे. उद्या लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाची सुरवात होईल. या वेळी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनील खेडेकर व कार्यवाह सुमेध करमरकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT