कोकण

शिरोडा ग्रंथालयात सोमवारी मालवणी साहित्य संमेलन

CD

swt252.jpg
53356
सतीश लळीत

शिरोडा ग्रंथालयात सोमवारी
मालवणी साहित्य संमेलन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग ५३ व्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून सोमवारी (ता. ३१) दुपारी ३.३० ते रात्री ८ या वेळेत शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने मालवणी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. ग्रंथालयाच्या मच्छिंद्र कांबळी सभागृहात आयोजित या संमेलनाच्या अध्यक्षपदी मालवणी बोलीभाषेचे अभ्यासक, घुंगुरकाठी या संस्थेचे संस्थापक तथा महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अधिकारी सतीश लळीत हे असणार आहेत. पारंपरिक पद्धतीने संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर ‘मालवणी साहित्यात काय असावे, काय नसावे?’ या विषयावर मालवणी साहित्यिक तथा निवृत्त प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात मालवणी साहित्यिक कल्पना मळये व मालवणी भाषेवर संशोधन करणाऱ्या तनुजा तांबे सहभागी होणार आहेत.
दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘जयवंत दळवी यांचा मालवणीनामा’ हा त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांत वापरलेल्या मालवणी शब्दांचा उहापोह करणारा कार्यक्रम सादर केला जाईल. शेवटच्या सत्रात मालवणी भाषेत काव्यलेखन करणाऱ्या कवयित्री डॉ. सई लळीत यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे काव्यसंमेलन होईल.
संमेलनाचे अध्यक्ष सतीश लळीत यांच्या समारोपपर भाषणाने संमेलनाची सांगता होईल. संपूर्ण संमेलनाचे निवेदन सचिन दळवी करणार आहेत. मालवणी बोलीप्रेमींनी या संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन आजगाव साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा मालवणी कवी विनय सौदागर आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT