-rat२५p२७.jpg-
२५N५३३५१
सुरभी अभ्यंकर
---
रत्नागिरीच्या सुरभी अभ्यंकरची अमेरिकेत भरारी
पीएचडी पूर्ण ; अल्झायमर, मधुमेह, लठ्ठपणावर संशोधन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः शहराजवळील कर्ला येथील सुरभी अभ्यंकर हिने अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन, इंडियानापोलिस, इंडियाना (युएसए) येथून जैवरसायनशास्त्र आणि आण्विक जीवशास्त्र विषयात पीएचडी मिळवून लक्षणीय कामगिरी केली आहे.
तिचे संशोधन अल्झायमर रोग, वृद्धत्व, मधुमेह आणि लठ्ठपणा यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांवर केंद्रित आहे. विशेषतः अल्झायमर रोग शोधण्यासाठी आणि निदानासाठी दृष्टिपटलाचा (रेटीना) बायोमार्कर म्हणून वापर करण्यावर भर दिला आहे. अल्झायमर रोग हा एक मेंदूचा विकार आहे जो हळूहळू स्मरणशक्ती आणि विचारकौशल्ये नष्ट करतो. मधुमेह शरीरात पुरेसे इन्सुलिन नसल्यास रक्तामधील उपलब्ध ग्लुकोज पेशींना न मिळता रक्तामध्येच राहते. अनियंत्रित मधुमेहामुळे विविध आरोग्यविषय गुंतागुंत होतात. याबाबत तिने संशोधन केले आहे. तिच्या शैक्षणिक प्रवासाची सुरवात रत्नागिरीतील फाटक हायस्कूलमधून झाली. त्यानंतर तिने गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातून सूक्ष्मजीवशास्त्र विषयात विज्ञान शाखेतील पदवी आणि मुंबई विद्यापिठातून जीवभौतिकशास्त्र विषयात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी (एमएस्सी) मिळवली.
----
सहा विद्यापिठांकडून बोलावण
एमएस्सीनंतर सुरभीला केईएम हॉस्पिटलमध्ये नैदानिक संशोधन समन्वयकाची (क्लिनिकल रिसर्च को-ऑर्डिनेटर) नोकरी मिळाली. जिथे तिने क्लिनिकल ट्रायल्समध्ये योगदान दिले तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांनी ग्रस्त रुग्णांना मदत केली. संशोधनाची आस असल्याने तिने अमेरिकेत डॉक्टरेट शिक्षण घेण्याचे ठरवले. तिने पीएचडीला पात्र होण्यासाठी अनेक प्रमाणित परीक्षांची कठोर तयारी केली. तिला अमेरिकेतील सहा विद्यापिठांकडून प्रवेशाची ऑफर मिळाली; मात्र तिने इंडियाना युनिव्हर्सिटीची निवड केली.
---
पीएचडी वडिलांना समर्पित
मधुमेहाच्या गुंतागुंतीमुळे मी माझे वडील गमावले आणि म्हणूनच ही पीएचडी मी माझ्या वडिलांना समर्पित करत आहे, असे तिने सांगितले. सुरभीच्या प्रबंधाने मधुमेह आणि अल्झायमर रोग क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तिने ६ पीअर-रिव्ह्यूड पेपर प्रकाशित केले आहेत. त्यांची गुणवत्ता आणि अचूकता सुनिश्चित होते. तिने १४ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले संशोधन सादर केले आहे. अनेक प्रवास पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार मिळवले आहेत. अलीकडेच, तिला इंडियाना युनिव्हर्सिटीकडून एलिट ५० पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांपैकी फक्त ५० विद्यार्थ्यांना हा सन्मान दिला जातो.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.