कोकण

खारेपाटणमध्ये शिवसेनेतर्फे रस्त्याच्या कामाला प्रारंभ

CD

swt2511.jpg
53370
खारेपाटणः रस्ताकाम प्रारंभप्रसंगी उपस्थित शिवसेना उपनेते संजय आंग्रे, संदेश पटेल, मंगेश गुरव व इतर पदाधिकारी. (छायाचित्र ः एन. पावसकर)

खारेपाटणमध्ये शिवसेनेतर्फे
रस्त्याच्या कामाला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २५ : शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून खारेपाटण जिजामातानगर येथील अंतर्गत रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण कामासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या कामाचा प्रारंभ शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी शिवसेना कणकवली तालुका विधानसभा प्रमुख संदेश पटेल, उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंगेश ब्रम्हदंडे, शहरप्रमुख सुहास राऊत, स्थानिक रहिवासी संतोष राऊत, कुबल गुरुजी, उन्हाळकर गुरुजी, किशोर माळवदे, तृप्ती पाटील, सुभाष गुरव, दत्ताराम गुरव, प्रशांत गाठे, सागर कांबळे, संदीप पाटील यांसह गावकार सुरेश गुरव उपस्थित होते. जिजामातानगर राऊत यांच्या घराकडे जाणारा रस्ता व रवी गोखले घराकडे जाणारा रस्ता या दोन्ही कामांचा आज प्रारंभ करण्यात आला.
यावेळी गुरव यांनी खारेपाटण जिजामाता नगरविकास कामांसाठी भरीव विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार किरण उर्फ भैया सामंत, आमदार नीलेश राणे यांसह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT