कोकण

देवगड येथे लोकअदालतीत १८,९२,२४२ रुपयांची वसुली

CD

देवगड येथे लोकअदालतीत
१८,९२,२४२ रुपयांची वसुली
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ : देवगड तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्यावतीने येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा सुमारे ७२३ पैकी एकूण ३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून सुमारे १८ लाख ९२ हजार २४२ रुपये इतकी वसुली झाली.
उच्च न्यायालय मुंबई, राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ओरोस (सिंधुदुर्ग) यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून येथील दिवाणी न्यायालय ‘क’ स्तर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. याचे उद्‌घाटन दिवाणी न्यायाधीश तथा देवगड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष यांच्या हस्ते झाले. चालू वर्षातील ही पहिली राष्ट्रीय लोकअदालत होती.
या राष्ट्रीय लोकअदालतीत दिवाणी व फौजदारी खटले तसेच वादपूर्व प्रकरणे अशा ७२३ पैकी एकूण ३२ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून सुमारे १८ लाख ९२ हजार २४२ रुपये इतकी वसुली झाली. या लोकअदालतीत दिवाणी व फौजदारीकडील एकूण ४८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील २३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून सुमारे १७ लाख १७ हजार ६०० रुपये इतकी वसुली झाली. बँक, महावितरण यातील सुमारे ६५७ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून एकूण १ लाख ७४ हजार ६४२ रुपये इतकी वसुली झाली. पॅनेल सदस्य म्हणून ॲड. आशिष लोके यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT