कोकण

नगरपंचायतीसाठी ओरोस ग्रामसभेचा ठराव

CD

53394
53395

नगरपंचायतीसाठी ओरोस ग्रामसभेचा ठराव
बहुमताने मंजूरः सहभागासाठी दिली सहमती
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २५ः सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेमध्ये ओरोस ग्रामपंचायतीचा समावेश करावा की न करावा यासाठी ओरोस ग्रामपंचायतीने आज आयोजित केलेल्या ग्रामसभेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ग्रामसभेने आवाजी बहुमताने सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी आणि त्यामध्ये ओरोस गावचा समावेश करण्याचा ठराव मंजूर केला आहे.
ओरोस सरपंच आशा मुरमुरे यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस श्री देव रवळनाथ रंगमंच सभा मंडपात ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी उपसरपंच पांडुरंग मालणकर, ग्रामविकास अधिकारी सरिता धामापूरकर, सर्व ग्रामपचायत सदस्य, माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वलावलकर, माजी सरपंच प्रमोद परब, प्रीती देसाई, उदयकुमार जांभवडेकर, संतोष वालावलकर, छोटू पारकर, प्रकाश जैतापकर, नागेश ओरोसकर, प्रकाश देसाई, बबन सावंत, शेखर सावंत, सतीश लळीत, अरविंद सावंत, आदेश नाईक उपस्थित होते.
सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेसाठी ओरोस, रानबांबूळी आणि अणाव ग्रामपंचायतीने ठराव घेण्याकरिता खास ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढले होते. त्यानुसार ओरोस ग्रामपंचायतीने नगरपंचायत स्थापनेसाठी आज खास ग्रामसेभेचे आयोजन केले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीमध्ये ओरोस, रांनबांबूळी आणि अणाव या तीन गावांचा समावेश आहे. वाढती नागरी वस्ती व अपुऱ्या सुविधा लक्षात घेऊन तिन्ही गावांचा समावेश असलेल्या सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेचा प्रस्ताव २०१६ मध्ये शासनाला सादर केला होता. त्याची प्रारूप प्रसिद्धीही झाली होती. मात्र, नगरपंचायत मंजुरी अगदी मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेत अडकली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांकडून सातत्याने नगरपंचायत स्थापन करण्याची मागणी सुरु होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा फेर प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
जिल्हाधिकऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकारणच्या सभेत सिंधुदुर्गनगरी प्राधिकारणसह ओरोस, रानबांबूळी आणि अणाव या तिन्ही गावाचा समावेश करून नगरपंचायत स्थापन करण्यासाठी शासनाला फेर प्रस्ताव सादर करण्यासाठी तिन्ही गावांनी ग्रामसभा घेऊन नगरपंचायत स्थापनेबाबत ठराव घेण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे तिन्ही ग्रामपंचायतीना कळविण्यात आले आहे. त्यानंतर ओरोस ग्रामपचायतीने नगरपंचायत स्थापनेसाठी ग्रामसेभेचे आयोजन केले होते. या सभेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेच्या सुरुवातीला ग्रामसभा सचिव सरिता धामपूरकर यांनी सभा आयोजनाचा उद्देश सांगितला. त्यानंतर ग्रामस्थ सतीश लळीत यांनी विकासाच्या दृष्टीने नगरपंचायत होणे आवश्यक आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी आणि त्यामध्ये ओरोस गावाचा समावेश करण्यात यावा, असा ठराव मांडला. या ठरवाला उदयकुमार जांभवडेकर यांनी अनुमोदन देताच ग्रामस्थांनी हात वर करत आवाजी बहुमतदानाने ठरावाला बहुमत दिल्यानंतर सरपंच मुरमुरे यांनी हा ठराव मंजूर केला. दरम्यान, सभा संपल्यानंतर ठराव मंजूर करण्यावरून ग्रामस्थामध्ये किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

शेतकऱ्याची जमीन हायवेत गेली, १.७७ कोटी मिळाले; पण १८ वर्षांच्या लेकानं गेमिंगमध्ये गमावले, फसवणूक झाल्यानं विष प्यायला

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT