swt2521.jpg
53432
कुडासेः येथे उपोषणास बसलेले ग्रामपंचायत सदस्य आत्माराम देसाई यांना लेखी आश्वासनाचे पत्र देताना ग्रामीण पाणीपुरवठाचे अधिकारी.
नळयोजना मंजूर; मात्र लाभच नाही
कुडासेत उपोषणः ‘पाणीपुरवठा’कडून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २५ः कुडासे येथील भरपाल, भोमवाडी, धनगरवाडी येथील ग्रामस्थांना जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर असलेल्या नळ योजनेचा लाभ मिळत नसल्याने ग्रामपंचायत सदस्य आत्माराम जीवबा देसाई यासह ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायतसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. पंधरा दिवसात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता यांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.
कुडासे येथील भरपाल, भोमवाडी, धनगरवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजना मंजूर आहे. यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत येथील ग्रामस्थांना या नळ योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतसमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य देसाई यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता. प्रशासनाने यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने देसाई यांसह ग्रामस्थांनी सोमवार (ता.२४) पासून येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी उपोषणस्थळी भेट दिली. जलजीवन मिशन अंतर्गत योजनेतील नाल्यातील पाईपलाईनला काँक्रिटीकरण करणे, नाल्यावरती पीसीसी करणे, वॉल चेंबर बसविणे, टाकीचे वॉटरप्रूफिंग करणे, राऊळवाडी पाईपलाईन दुरुस्ती तसेच भोमवडी, धनगरवाडी येथे योजनेतील टाकीचे जीआय पाईप बसविणे, पाईप जॉईंट करणे व विहिरीवरील पंपिंग मशिनरी बसविणे ही कामे प्रलंबित आहेत. येत्या पंधरा दिवसात ठेकेदाराकडून कामे पूर्ण करून घेण्यात येतील, असे आश्वासनाचे पत्र या विभागाचे उपअभियंता यांनी उपोषणकर्ते देसाई यांना दिल्याने सायंकाळी त्यांनी उपोषण मागे घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.