कोकण

पोफळी स्कूलमध्ये विषुव दिन

CD

पोफळी स्कूलमध्ये
विषुव दिन साजरा
चिपळूण ः तालुक्यातील पोफळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विषुव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भूगोल शिक्षक आणि अवकाश निरीक्षक आंबवकर यांनी विद्यार्थ्यांना विषुव दिनाचे महत्त्व सांगितले आणि प्रात्यक्षिकामधून माहिती दिली. पहिली ते नववीमधील विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकामधून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा कशा निश्चित केल्या जातात याची अनुभूती प्रत्यक्ष घेतली. या वेळी मुख्याध्यापक सोळुंके, सर्व शिक्षक, कर्मचारी, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. सूर्याच्या कर्क वृत्तावरून मकर वृत्ताकडे जाण्याच्या भासमान मार्गाला दक्षिणायन आणि मकर ते कर्क वृत्ताकडे जाण्याच्या मार्गाला उत्तरायण म्हणतात. या दोन्ही मार्गक्रमणावेळी सूर्य २१ व २२ मार्च आणि २२ व २३ सप्टेंबर असे दोनदा विषुववृत्त पार करत असतो. त्या दिवसांना विषुव दिन किंवा संपात दिन म्हटले जाते.

आयटीआयमध्ये
रक्तदान शिबिर
चिपळूण ः सती येथील चिपळूण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात ५१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. संस्थेचे प्राचार्य शेट्ये, उपप्राचार्य वानखडे यांनी या शिबिरास उपस्थित सर्व निदेशक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रक्तपेढी विभागप्रमुख पावरा व सौरभ दुबे यांनी रक्तदान का करावे, याबाबत मार्गदर्शन केले.

मंडणगडमध्ये
क्षयरोग दिन
मंडणगढ ः प्राथमिक आरोग्यकेंद्र पणदेरी, कुंबळे, देव्हारे व सर्व उपकेंद्राच्यावतीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये क्षयरोगाबाबत जागृती करण्यात आली. सरकारी दवाखान्यात या आजारावर मोफत औषधोपचार केले जातात याशिवाय उपचारात क्षयरुग्णास त्याचे पोषण आहारासाठी शासनाकडून दरमहा एक हजार रुपये बँकखात्यात वर्ग करून दिले जातात, अशी माहिती डॉ. गावंडे यांनी दिली. या वेळी आरोग्य पर्यवक्षेक पारधी, शिंदे, आरोग्यसेवक पारधी, प्रशालेचे मुख्याध्यापक आबासाहेब हुलगे, उपमुख्याध्यापक अर्जुन हुल्लोळे, पर्यवेक्षक शांताराम बैकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

SCROLL FOR NEXT