गव्याच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करा
डॉ. विनय नातू ः मुख्य वनसंरक्षकांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २५ : गुहागर व चिपळूण तालुक्यातील वन्यप्राण्यांकडून होत असणाऱ्या नुकसानीमध्ये गवा प्राण्याने केलेल्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यासाठी काही आराखडा तयार करून वनविभागामार्फत आराखड्याची अंमलबजावणी करावी. शेतकऱ्यांना त्यांच्या बागायतीला होणाऱ्या त्रासापासून संरक्षण मिळण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी माजी आमदार विनय नातू यांनी नागपूर येथील वन्यजीव मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गुहागर तालुक्यातील झोंबडी गावामध्ये आंबा व काजूची बाग आहे. या आंबा कलमांच्या बागेमध्ये गव्याने कैरी खाणे, आंबा झाडाला घासून आंबे पाडून आंबाबागेची नुकसान करत आहेत. या भागातील गवारेडे कळपाने सुपारी, काजू, आंबा या सर्व बागायती क्षेत्रांमध्ये येतात. बागायती क्षेत्रातील झाडांची मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. या सर्व नुकसानीचे प्रमाण फार मोठे आहे. बागायतीचे होणारे नुकसान आर्थिक मदतीने न भरून येणारे आहे. दिवसेंदिवस गव्यांचा त्रास गुहागर व चिपळूण तालुक्यातील शेतकऱ्यांना वाढत आहे. यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, असे पत्रात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.