जिल्ह्यात ९७५१ असाक्षरांनी दिली परीक्षा
उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम; आजी-आजोबांचाही सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः केंद्र पुरस्कृत उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत (NBSK) नुकतीच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राज्यातील सुमारे साडेसहा लाख असाक्षरांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ९ हजार ७५१ असाक्षरांचा समावेश आहे. ही परीक्षा १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींसाठी होती.
कौशल्यांमध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंबकल्याण आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२४- २५ मध्ये उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांची रविवारी (ता. २३) चाचणी घेण्यात आली. यु-डायस क्रमांकानुसार असाक्षरांची नोंदणी केलेली प्रत्येक शाळा ही परीक्षा केंद्र होती. परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ऑफलाईन पद्धतीने व असाक्षरांच्या सोयीनुसार चाचणी घेण्यात आली. ही चाचणी एकूण १५० गुणांची होती. जिल्ह्यातील ९ हजार ७५१ असाक्षरांनी परीक्षा दिली आहे. त्यात ७ हजार ६४८ महिला आणि २ हजार १०३ पुरुषांचा समावेश आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीच्या निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्र व गुणपत्रक देण्यात येणार आहे. या निमित्ताने ७० वर्षांच्या पुढील आजी-आजोबाही नवसाक्षर होण्याचा निश्चय करून आनंदाने परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. जे असाक्षर परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा द्यायला समर्थ नव्हते अशा असाक्षरांना स्वतःच्या घरी चाचणी देण्याची व्यवस्था करण्यात आली.
---
कोट
मागील वर्षीपेक्षा यंदा परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे ‘उल्लास’ ही जनचळवळ बनत आहे. या चाचणीतून व्यक्तीच्या जीवनात आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंबकल्याण ही जीवनकौशल्ये विकसित होतील तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
- राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.