रेल्वेत वृद्धाच्या
मोबाईलची चोरी
रत्नागिरी ः रत्नागिरी रेल्वेस्टेशन तेजस एक्स्प्रेसमध्ये चढणाऱ्या वृद्धाच्या खिशात ठेवलेला ३० हजाराचा मोबाईल चोरट्याने पळवला. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. २२) रात्री आठच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशनदरम्यान घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप रामनाथ धारीया (वय ६३) हे शनिवारी रत्नागिरी रेल्वेस्टेशन फलाट क्र. ३ येथून कोकण रेल्वेच्या तेजस एक्स्प्रेसमध्ये चढत असताना त्यांच्या शर्टच्या खिशातील ३० हजाराचा मोबाईल गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने पळवला. या प्रकरणी धारीया यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
---
सार्वजनिक ठिकाणी
मद्यपिणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील मांडवी येथील झाडीझुडपात मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक दिलीप विलणकर (वय २९) व ओमकार राजकुमार वाडेकर (वय ३०) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास मांडवी येथील रस्त्याच्या बाजूला झाडीझुडपात निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित तरुण हे झाडीझुडपात मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे व पोलिस हेडकॉन्स्टेबल भालचंद्र मयेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
--------
‘त्या’ चालकाचा
सुगावा नाहीच
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथील रस्त्यावर नारायण दगडू शिगवण यांना धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत होऊन पलायन करणाऱ्या चालकाचा पोलिसांना अद्यापही सुगावा लागलेला नाही. पोलिसांकडून फरार चालकाचा कसून शोध घेण्यात येत आहे. कळंबणी गावडेवाडी येथील रहिवासी नारायण शिगवण हे रस्त्याने जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.
''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.