swt2531.jpg
53495
बांदाः सटमटवाडी येथे मृत गव्याला बाहेर काढताना वन कर्मचारी.
विहिरीत पडलेल्या गव्याचा बुडून मृत्यू
बांदा-सटमटवाडीतील घटनाः वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न असफल
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ः येथील सटमटवाडीतील दीपक पेंडसे यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत सोमवारी रात्री गवारेडा पडला. याबाबतची कल्पना वनविभागला दिली. वनविभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतरही अखेर गव्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. त्यानंतर त्याला बाहेर काढून वनविभागामार्फत त्याची विल्हेवात लावण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा-सटमटवाडी येथे गव्या रेड्यांचा कळप गेले कित्तेक दिवस काजू बायायतीमध्ये धुडगूस घालत होता. सोमवारी रात्री दीपक पेंडसे यांच्या बागेतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत भलामोठा गावारेडा पडला. पेंडसे यांनी सकाळी पाण्याची मोटर चालू केली असता पाईपमधून गढूळ पाणी येऊ लागले. ते कशामुळे येते हे पाहण्यासाठी श्री. पेंडसे विहिरीपाशी गेले. विहिरीत डोकावून पाहिले असता गवारेडा पडल्याचे त्यांना निदर्शनास आले. त्यांनी बांदा व सावंतवाडी येथील वनविभागाला याची कल्पना दिली. सावंतवाडी वनपरीक्षेत्र सुहास पाटील हे जलद बचाव टीम घेऊन घटनास्थळी पोहचले. यावेळी गव्याला सखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दोरीच्या सहाय्याने बचाव कार्य सुरु केले. ही घटना गावात समजताच सर्वांनी गव्याला पाहण्यासाठी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. रात्री पडलेल्या गव्याचा विहिरी बाहेर पडण्यासाठी मोठी धडपड सुरु होती. धडपडीमध्ये गवा जखमी झाला होता. शेवटी बाहेर पडण्याच्या नादात गव्याचा बुडून मृत्यू झाला. मृत गव्याला वनविभागाने स्थानिकांच्या सहकार्याने बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावली.
यावेळी सावंतवाडी वनपरीक्षेत्र सुहास पाटील, बांदा वनपाल प्रमोद सावंत, वनरक्षक सुयश पाटील, पवन टारपे, जलद बचाव टीमचे बबन रेडकर, शुभम कळसुळकर, आनंद राणे, पुंडलिक राऊळ, तुषार सावंत, ग्रामस्थ दशरथ परब, महेश शिरोडकर, दीपक पेंडसे, विष्णू वसकर, कौस्तुभ पेंडसे, देवानंद कळंगुटकर, मच्छिंद्र गडकरी, अजित कळगुटकर, अभिषेक कळंगुटकर, ज्ञानेश्वर म्हावळणकर, गोविंद गडकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.