अवेळी पावसाने
बांद्याला झोडपले
बांदा, ता. २५ः बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी सोसाट्याचा वारा व विजांच्या गडगडाटासह अवेळी पावसाने झोडपून काढले. ग्रामीण भागात अवकाळीचा जोर अधिक होता. वादळी वाऱ्यामुळे शहरातील वीज पुरवठा खंडीत झाला; मात्र नुकसान झाल्याची कुठेही नोंद नाही.
बांदा परिसरात आज दिवसभर दमट वातावरण होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू झाला. अचानक वादळी वारे सुरू झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने काजू व आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने शेतात गुरांसाठी ठेवलेले गवत भिजल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली. सायंकाळी विजांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर पावसास प्रारंभ झाला. सायंकाळी उशिरा शहरात पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. डिंगणे, नेतर्डे, कळणे, डेगवे पंचक्रोशीलाही अवेळी पावसाने झोडपले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.