कोकण

३८ थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा

CD

-rat२६p३६.jpg -
२५N५३६४५
खेड ः थकीत पाणीपट्टी धारकांच्या नळजोडण्या तोडताना पाणी विभागाचे कर्मचारी.
----
थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा
खेड पालिका ; कर रक्कम भरण्यास कुचराई
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ : नगर पालिकेच्या पाणीविभागाच्या पथकाने थकीत पाणीपट्टीधारकांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. २ दिवसात ३८ थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्यात आल्या. आतापर्यंत पाणीपुरवठा खंडित करण्यात आलेल्या थकबाकीदारांची संख्या ४३ वर पोहचली आहे. यातील काही थकितदारांनी पाणीपट्टीची रक्कम भरणा करत नगर प्रशासनाला सहकार्य केल्याचे सांगण्यात आले. मुख्याधिकारी महादेव रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील उमेश रेपाळ, पाणीपुरवठा अभियंता अक्षय लोहार, प्रणील जाधव, राजेश खेडेकर, मुकेश पेवेकर, सुनील पिलदणकर, सुयोग शिर्के, निखिल यादव आदींच्या पथकांमार्फत थकितदारांच्या नळजोडण्या तोडण्याची मोहीम गतीमान केली आहे. आठवडाभरापासून पुन्हा ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
नगरपालिकेनेही सुटीच्या दिवशी ३१ मार्चपर्यंत कराची रक्कम स्वीकारण्यासाठी वसुली कक्ष खुला ठेवला आहे. थकीत पाणीपट्टीधारकांनी कराची रक्कम भरणा करून नगर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT