- rat२७p६.jpg-
२५N५३७७२
साखरपा : नैसर्गिक रंग वापरून रंगपंचमी साजरी करताना सप्रेवाडी शाळेतील विद्यार्थी.
---
नैसर्गिक रंगाने रंगपंचमी साजरी
सप्रेवाडी शाळा ; फुलांपासून तयार केले रंग
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता २७ : होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीची विद्यार्थी आतूरतेने वाट पाहत असतात. यामध्ये कृत्रिम रंगांना फाटा देत देवधामापूर येथील सप्रेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करून त्याचा वापर रंगपंचमी साजरी करण्यासाठी केला. त्यांच्या वैविध्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रंग तयार करून त्यातून रंगपंचमी साजरी करावी, हा विचार देवधामापूर येथील सप्रेवाडी शाळेतील उपक्रमाशील शिक्षक सतीश वाकसे यांच्या मनात आला. त्यांनी मुख्याध्यापक अरूण जाधव, शाळा व्यानास्थापन समितीच्या अध्यक्ष सतीश सप्रे, उपाध्यक्षा सुहासिनी भातडे तसेच अन्य सदस्यांना बोलून दाखवला. त्यानंतर वाकसे यांनी विद्यार्थ्यांना घरीच फुलांपासून नैसर्गिक रंग कसे तयार करायचे याचे प्रशिक्षण दिले. पळस बुधवारी (ता.२६) शाळेत हे रंग वापरून विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी केली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.