swt272.jpg
53798
अणसूरः सिंधुदुर्ग शिवप्रतिष्ठान प्रमुख मंगेश पाटील यांचा सन्मान करताना सरपंच सत्यविजय गावडे.
छत्रपती संभाजी महाराजांना
अणसूर ग्रामस्थांतर्फे वंदन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २७ ः छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास कार्यक्रम अणसूर गावात नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त अणसूर सरपंच मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदानावर आधारित ''छावा'' चित्रपट दाखविण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सिधुदुर्ग जिल्हाप्रमुख मंगेश पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोवा अध्यक्ष मंदार गावडे, सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, सदस्य सीमा गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, सुधाकर गावडे, सामाजिक कार्यकर्ते अनिल गडकर, भाजपा कार्यकर्ते बिट्टू गावडे, सुनील गावडे, ज्येष्ठ नागरिक नवसोजी गावडे, नीलकंठ गावडे, प्रभाकर गावडे, संदेश गावडे, दीपक गावडे, प्रभाकर गावडे, गजमुख गावडे आदी उपस्थित होते. मंगेश पाटील याच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व सरपंच गावडे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्र व बलिदानावर मार्गदर्शन केले. सरपंच गावडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.