कोकण

विद्यार्थ्यांनो, वैज्ञानिक चित्रपट पहा

CD

54026

विद्यार्थ्यांनो, वैज्ञानिक चित्रपट पाहा

रवींद्र खेबुडकर ः ‘इस्रो’ सफरीत सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः ‘‘नेहमी ‘मंगलयान’सारखे वैज्ञानिक चित्रपट पाहा. त्यामुळे वैज्ञानिक प्रकल्पावर कसे काम करतात ते पाहायला मिळेल,’’ असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी इस्रो सेंटरला भेट दिलेल्या मुलांना केले. यावेळी मुलांनीही प्रश्नांवर अभ्यासपूर्ण प्रतिसाद दिला.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सिंधू प्रज्ञाशोध परीक्षेत तालुक्यातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांची १८ ते २२ मार्चदरम्यान इस्रो सेंटरला थुंबा (तिरुवनंतपूरम) या ठिकाणी अभ्यास सहल आयोजित केली होती. यशस्वीरीत्या अभ्यास सहल पूर्ण करून आलेल्या निवडक दहा मुलांशी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दालनात संवाद साधला आणि सहलीची यशस्विता पडताळली.
यावेळी अभ्यास सहलीत सहभागी शिक्षक तेजल ताह्मणकर, वैशाली पाटील, जान्हवी खानोलकर, जयसिंग खानोलकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी यशश्री ताम्हणकर-मसुरे देऊळवाडा, मयंक नंदगडकर-वेंगुर्ला क्रमांक १, प्राजक्ता भोकरे- वेंगुर्ला क्रमांक २, जान्हवी पाटील -कुंभवडे, वरद बाकरे- कणकवली क्रमांक ३, सम्यक पुरळकर-कणकवली क्रमांक ३, चिन्मयी खानोलकर- दोडामार्ग क्रमांक १, आर्यन कुलकर्णी-वारगाव क्रमांक १, दीपाली भणगे-घोडगेवाडी, इशिका चव्हाण कसाल क्रमांक १ आदी शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.
---
‘पाल्याला नेहमी मोठी स्वप्नं दाखवा’
प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनीही मुलांशी संवाद साधताना ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासारखी दिवसा स्वप्ने पाहा आणि त्यादिशेने वाटचाल करा, असे सांगितले. उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी पालकांशी संवाद साधताना आपल्या पाल्याला स्वप्न नेहमी मोठी दाखवा. मात्र, वास्तव परिस्थितीची जाण मुलांना करून द्यायला विसरू नका, असे सांगत त्यांनी मुलांना आताच करिअरची दिशा ठरवून त्या दिशेने वाटचाल सुरू करायचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT