कोकण

वेंगुर्लेत ५ एप्रिलपासून बॅडमिंटन लीग वेंगुर्लेत ५ एप्रिलपासून बॅडमिंटन लीग

CD

54048

वेंगुर्लेत ५ एप्रिलपासून बॅडमिंटन लीग

‘रोटरी’तर्फे आयोजन ः मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते होणार उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २८ ः रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्यातर्फे ५ व ६ एप्रिलला वेंगुर्ले कॅम्प येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय चॅम्पियन्स बॅडमिंटन लीगचे आयोजन केले आहे. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे अध्यक्ष योगेश नाईक यांनी ही माहिती दिली.
शहरातील शिरोडकर कंपाऊंड येथील रोटरी क्लबच्या कार्यालयात चॅम्पियनशिप बॅडमिंटन लीग स्पर्धेच्या माहितीसाठी पत्रकार परिषद
आयोजित केली होती. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश नाईक, सचिव अॅड. प्रथमेश नाईक, सदस्य अनमोल गिरप, पंकज शिरसाट, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, राजेश घाटवळ, माजी अध्यक्ष राजू वजराटकर, मृणाल परब आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्‍घाटन ५ एप्रिलला दुपारी १२ वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेच्‍या मुख्याधिकाऱ्यांच्या हस्ते व रोटरी क्लब पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेचे इव्हेंट चेअरमन म्हणून अनमोल गिरप हे काम पाहणार आहेत. या स्पर्धेत नामवंत खेळाडूंचा सहभाग असणार आहे. निवड प्रक्रियेतून प्रत्येक संघात १० खेळाडू निवडले जाणार आहेत. यात सर्व गटातील खेळाडूंचा सहभाग असणार आहे. स्पर्धेत एकूण ८ संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात वेंगुर्ला वायपर्स, मॅजिक टच वेंगुर्ला, के. एन. के. स्मॅशर्स कणकवली, दोडामार्ग डायमोनोज, स्मॅशिंग लायन्स सावंतवाडी, कुडाळ ग्लॅडीएटर्स, सेवन ए.एम. कुडाळ, बॅडमिंटन लवर्स वैभववाडी अशा आठ संघाचा समावेश असणार आहे. विजेत्या संघास ३० हजार व उपविजेत्या संघास २० हजार रुपये तसेच कायमस्वरूपी चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. इतर वैयक्तिक विजेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. यात सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी या स्पर्धेचे इव्हेंट चेअरमन अनमोल गिरप यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT