कोकण

रमजान ईदीमुळे चिपळूण बाजारपेठेत तेजी

CD

रमजान ईदमुळे चिपळूण बाजारपेठेत तेजी
दुधासह सुका मेवा महाग; शिरखुर्मा, शेवयांसाठीच्या पदार्थांची खरेदी सुरू
चिपळूण, ता. २८ : रमजान ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांच्या घरी खास बनवण्यात येणाऱ्या शिरखुर्म्याच्या तयारीला वेग आला आहे. रमजान ईद दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठांमध्ये शिरखुर्मा आणि शेवयांसाठी आवश्‍यक पदार्थांची जोरदार खरेदी सुरू आहे. किराणा दुकाने, सुका मेवा विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. दूध आणि सुका मेव्याचे दर किंचित वाढले असले तरी ईदच्या आनंदात त्याचा विशेष फरक जाणवत नाही. त्यामुळे चिपळूण बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे.
रमजान ईदचा खास मेन्यू म्हणजे शिरखुर्मा आणि शेवई. हे दोन गोड पदार्थ ईददिवशी प्रत्येक मुस्लिम कुटुंबाच्या घरी बनवले जातात. कुटुंब किती मोठे, ईदच्या दिवशी किती पाहुणे घरी येणार आहेत आणि कितीजणांच्या घरी शिरखुर्मा पाठवायचा आहे, यावरून शिरखुर्म्यासाठी किती साहित्य आणायचे, हे ठरवले जाते. बदाम, काजू, पिस्ता, खोबरे, खसखस, शेवया, खजूर, अंजीर, जर्दाळू, चारोळी असा सुकामेवा शिरखुर्म्यासाठी वापरण्यात येतो. अनेक घरांत आता या गोष्टींची खरेदी झाली असून, खोबरे किसून ठेवणे, बदाम, अंजीर आणि इतर सुकामेव्याचे तुकडे करून तळून ठेवणे, खजुरातील बिया काढणे अशा तयारीची लगबग घराघरांत सुरू झाली आहे. कपडे, दागिने, भेटवस्तू आदींच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधव आणि महिला येथील बाजारपेठेत सायंकाळी गर्दी करत आहेत. त्यामुळे व्यापारीही सुखावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

‘मी खूप बदनाम आहे, माझा भूतकाळ सडलेला आहे’ असं का म्हणालेल्या रेखा?

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT