खेड नगरपालिकेच्या
उद्यानाभोवती संरक्षक भिंत
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २८ : येथील नगरपालिकेच्या कार्यालयाजवळील उद्यानात मोकाट जनावरांचा सुरू असलेला वावर रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी उद्यानाच्या सभोवतालची संरक्षक जाळी हटवली आहे.
नगरपालिकेच्या कार्यालयासमोर उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानात कारंजादेखील बसवण्यात आला होता. सुरवातीचे काही दिवस वगळता त्यानंतर कारंजा बंद पडल्यामुळे उद्यान केवळ नावापुरतेच उरले होते. याच उद्यानाचा वापर काहीजण दुचाकी उभी करण्यासाठी करत होते याशिवाय उद्यानात मोकाट जनावरांच्या शिरकाव्याने अस्वच्छता होत होती. मोकाट जनावरांचे उद्यानातच बस्तान आहे. या पार्श्वभूमीवर उद्यानालगत संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी आवश्यक त्या निधीचीही तरतूद केली आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.