कोकण

संगमेश्वर-शिंपणे उत्सवात लाल रंगाची मनसोक्त उधळण

CD

rat28p1४.jpg
54055
संगमेश्वर ः कसबा येथे शिंपणे उत्सवासाठी बांधण्यात आलेल्या हौदात डुंबताना मुले.
--------------
कसबा येथे शिंपणे उत्सवात
लाल रंगाची मनसोक्त उधळण
निनावी, जाखमाता मंदिरात दर्शनासाठी रांगा
संगमेश्‍वर, ता. २८ ः संगमेश्वर तालुक्यातील कसबा- संगमेश्‍वर येथील देवी जाखमातेचा शिंपणे उत्सवाचा खेळ शुक्रवारी (ता. २८) दिवसभर अपूर्व उत्साहात, लाल रंगाची मनसोक्त उधळण करत व मटण भाकरीच्या प्रसादाचा आस्वाद घेत संपन्न झाला. या उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी आपली हजेरी लावली. आज दिवसभर झालेल्या लाल रंगाच्या उधळणीमुळे कसबा-संगमेश्‍वर येथील सर्व रस्ते लाल लाल होऊन गेले होते.
आज सकाळी ६ वाजल्यापासूनच शिंपणे उत्सवातील लाल रंगाच्या उधळणीला सुरुवात झाली. दुपारनंतर यामधील उत्साह आणखी वाढत गेला. कसबा येथील चंडिका मंदिरात, संगमेश्‍वर येथील निनावी आणि जाखमाता मंदिरात तसेच फणसवणे येथील मूळ जाखमाता मंदिरातही भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारनंतर सालाबादच्या रखवाली देण्यास सुरुवात झाली. दिवसभर दिल्या जाणाऱ्या रखवालीमधील नारळ, कोंबडे, बकरे यांचा मंदिराजवळच प्रसाद तयार करण्यात येतो. या प्रसादामध्ये रात्री पाण्याचा हौद फोडताना दिल्या जाणाऱ्या बळीचा प्रसाद एकत्र करून उशिरा हजारो भाविकांना अत्यंत शिस्तबद्धरितीने मटण-भाकरीचे वाटप करण्यात आले. कसबा व संगमेश्‍वर येथे शिंपणे उत्सवामध्ये लहान मुलांना पाण्यामध्ये डुंबण्यासाठी पाण्याचे मोठे हौद बांधण्यात आले होते. दिवसभर या हौदात साठवण्यात आलेल्या पाण्यात मुलं मनसोक्त डुंबत होती.
उत्सवानिमित्त ग्रामदेवता जाखमाता, निनावी व कसबा येथील चंडिका मंदिरांना रंगरंगोटी करून आकर्षक सजावट केली होती. रात्री १० च्यादरम्याने कसबा व संगमेश्‍वर येथील फेरा पाणी साठवलेल्या हौदाजवळ आल्यानंतर मानकरी मंडळींचा हुकूम घेऊन व त्यांना मानाचा नारळ देऊन पाण्याचा हौद फोडण्यात आला. त्यानंतर प्रसादवाटप करण्यात आले आणि उत्सवाची सांगता झाली. संगमेश्वरचे पोलिस उपअधीक्षक शिवकुमार पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवानिमित्त चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

SCROLL FOR NEXT