मिरारोड येथे पाच एप्रिलला
एकांकिकांची अंतिम फेरी
कणकवली, ता. २८ ः ‘आम्ही मालवणी’ या फेसबुक समूहातर्फे आयोजित मालवणी एकांकिका २०२५ स्पर्धेची महाअंतिम फेरी शनिवारी ५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजल्यापासून मिरा रोड (जि. ठाणे) येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहात आयोजित केली आहे.
या महाअंतिम फेरीत क्राऊड नाट्य संस्था डोंबिवलीतर्फे ‘मिरग’, श्री स्वामी इव्हेंटसतर्फे ‘ती’चा अस्तित्व, शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठानतर्फे ‘भू-भू,’ श्री गणेश कलामंच कणकवलीतर्फे ‘काव काव’, अमरहिंद मंडळातर्फे ‘रेशन कार्ड’, सृजन द क्रिएशनतर्फे ‘फ्रिडम अॅट मिडनाईट’, या सहा एकांकिका सादर होणार आहेत. या सोहळ्याला लेखक, दिग्दर्शक, हास्यजत्राकार सचिन गोस्वामी, कवी डॉ. महेश केळुस्कर, अभिनेते पंढरीनाथ कांबळे, अभय खडपकर, अभिनेत्री माधवी जुवेकर आदी उपस्थित राहणार आहेत. या महाअंतिम सोहळ्याला बहुसंख्य मालवणी रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक सतेज दळवी, एकांकिका कार्यवाह विठ्ठल सावंत, प्रदीप तोंडवळकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.