54150
कासार्डेतील विविध समस्यांवर बोट
जनता दरबार ः पालकमंत्र्यांकडून दखल, सूचना
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २८ ः सिंधुदुर्गनगरी येथे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या जनता दरबारात भाजप युवामोर्चा कणकवली तालुकाध्यक्ष तथा कासार्डे ग्रामपंचायत सदस्य सहदेव ऊर्फ आण्णा खाडये यांनी कासार्डे गावातील विविध समस्या मांडल्या.
यावेळी सकारात्मक चर्चा करीत तातडीने कामे मार्गी लावण्याचे आदेश पालकमंत्री व उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिले. श्री. खाडये यांनी जिल्हा परिषद शाळा, कासार्डे जांभूळवाडी शाळा इमारतीवर छप्परसाठी निधी, मुंबई-गोवा महामार्गावर नवीन सेवारस्ता समस्या, कासार्डे तिठ्ठा सुशोभीकरण निधी, प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त पदे व औषध पुरवठा अनियमितता, कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी मंत्रालय मंजुरी मिळावी या कामाबाबत मंत्री राणे यांच्याशी जनता दरबारात सकारात्मक चर्चा करीत तातडीने मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, मंडलाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्यासह प्रकाश तिर्लोटकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.