कोकण

नाखरे अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा

CD

मद्यधुंद अवस्थेतील एकावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-खंडाळा रस्त्यावर प्रौढ मद्यधुंद अवस्थेत सापडला. जयगड पोलिस ठाण्यात संशयित प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ताराम वामन रहाटे (वय ५२, रा. वाटद, परटवणे, रत्नागिरी) असे प्रौढाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) दुपारी दीडच्या सुमारास वाटद रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दत्ताराम रहाटे दारूच्या नशेत फिरताना पोलिसांना दिसले. या प्रकरणी पोलिस हवालदार प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, दोघांवर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड ते गणपतीपुळे जाणाऱ्या रस्त्यावर उंडी फाट्याजवळ झाडाखाली व मालगुंड येथील आदर्श शाळेच्या समोरील रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अरुण गणपत गवाणकर (वय ५६, रा. उंडी कुणबीवाडी, रत्नागिरी) व शरद अशोक मयेकर (वय ४६, रा. मालगुंड भंडारवाडा, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. २७) सायंकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास उंडी फाटा व मालगुंड येथे निदर्शनास आल्या. या प्रकरणी पोलिस शिपाई पवन पांगरीकर व महिला पोलिस शिपाई अन्वी पुसाळकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नाखरे अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
पावस ः तालुक्यातील नाखरे-खांबडवाडी येथे झालेल्या अपघातप्रकरणी ''त्या'' मोटारचालकाविरुद्ध पावस सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत अविनाश खाके (वय २८, रा. नाखरे, कालकरकोंड, रत्नागिरी) असे संशयित मोटारचालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास खांबडफाटा ते नाखरे कालकरकोंड जाणाऱ्या रस्त्यावर खांबडवाडी येथे घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित खाके मोटार (एमएच ४७ एबी २१९४) ही कालकरकोंड नाखरे ते पावस अशी घेऊन येत असताना पावसहून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार चंद्रवदन शैलेंद्र शिंदे-दसूरकर (वय २९, रा. उंबरवाडी, नाखरे, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हवालदार ललित देऊसकर यांनी पावस पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT