कोकण

रत्नागिरी-दहावी परीक्षा कॉपीमुक्त, बारीवीत एक प्रकार

CD

दहावी परीक्षा कॉपीमुक्त, बारावीत एक प्रकार
कोकण विभागीय मंडळ; कॉपीमुक्त अभियानाचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ः कोकण विभागीय मंडळात एकही प्रकार मागील पाच परीक्षेत आढळून आला नव्हता. यंदाही तीच परंपरा अबाधित असून विभागीय मंडळात दहावी परीक्षेत कॉपीचा रकाना निरंकच आहे. मात्र, बारावी परीक्षेत रत्नागिरीत कॉपीचा एक प्रकार नोंदला गेला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याअंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीचे कोकण विभागीय मंडळ २०१२ पासून रत्नागिरीत कार्यरत आहे. या विभागीय मंडळात संपलेल्या फेब्रुवारी व मार्च २०२५ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी परीक्षेच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासाठी गैरमार्ग निव्वळ एक प्रकरण भरारी पथकाचे निदर्शनास आले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही गैरप्रकार निदर्शनास आलेला नाही. कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी घेतलेले विशेष परिश्रम यामुळेच हे अभियान यशस्वीपणे पार पडून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. चालू वर्षी रत्नागिरी दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम. देवेद्र सिंह व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद रत्नागिरी सुवर्णा सावंत व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. सिंधुदुर्ग कविता शिंपी यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील सर्व यंत्रणांनी उल्लेखनीय काम काम केले आहे. कोकण विभागीय मंडळाने स्थापनेपासून कायमच कॉपीमुक्त परीक्षा घेणारे मंडळ म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. यावर्षीच्या परीक्षेनंतर त्यामध्ये भरच पडलेली आहे. राज्यातील इतर विभागीय मंडळाशी तुलना करता कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात कोकण मंडळ आघाडीवर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही गैरमार्ग प्रकरण नाही. रत्नागिरीत १२ वी च्या परीक्षेत निव्वळ १ गैरमार्ग प्रकरण भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे. कोकण मंडळात इतर मंडळाच्या तुलनेने अगदीच नगण्य कॉपी प्रकार आढळून येतात, या मंडळात कॉपी होत नाही, याच्या कारणांचा बारकाईने आढावा घेतल्यास पुढील वस्तुस्थिती निदर्शनास येते.

कोट
दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील दक्षता समित्यांनी उत्तम भूमिका बजावली आहे. महसूल, पोलिस विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची शिक्षण विभागास मोलाची साथ मिळाली. कोकण विभागात कॉपीमुक्त परीक्षा ही संस्कृती रुजली आहे.
- राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर व कोकण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT