अंगणवाडीस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार जाहीर
उत्कृष्ट कामाची दखल ः जिल्ह्यातील २६ कर्मचाऱ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ३० ः जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस यांनी अंगणवाडीस्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना २०२४-२५ चा जिल्हा परिषदेच्या आदर्श पुरस्कारांची घोषणा प्रशासक तथा मुख्या कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत ८ प्रकल्प कार्यरत असून या प्रकल्पात कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिस यांना प्रतिवर्षी अंगणवाडी स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. यामध्ये जिल्ह्यामधून २ पर्यवेक्षिका व प्रत्येक प्रकल्पातून एक अंगणवाडी सेविका, १ मिनी सेविका व १ मदतनिस मिळून एकूण २६ कर्मचाऱ्यांची जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यासाठी प्रकल्पस्तरावर गुणांकनाद्वारे आदर्श कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. २०२४-२५ या वित्तीय वर्षामध्ये प्रकल्प स्तरावर १ मिळून एकूण ८ अंगणवाडी सेविका, ८ अंगणवाडी मिनी सेविका, ८ अंगणवाडी मदतनिस व जिल्हयातून २ पर्यवेक्षिका मिळून एकूण २६ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली. निवड करताना २०२३-२४ या वित्तिय वर्षात केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यात आलेले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.), जिल्हा कार्यक्रम अधिकारी (मबावि) सोमनाथ रसाळ उपस्थित होते.
तालुकानिहाय पुरस्कार विजेते असे ः देवगड- आरती कामतेकर (मिठबांव कोटकामते), पूजा रानडे (पडेल क्र. १), मीनाक्षी मांडवकर (मोंड रहाटेश्वर). वैभववाडी-शायरा रमदूल (उंबर्डे मेहबुबनगर), राजश्री जांभळे (वैभववाडी क्र.२, करुळ भोयाडेवाडी). अनिता कुडाळकर (वैभववाडी क्र.१, कोकिसरे विद्यामंदिर), कणकवली-प्रमिला फोपे (नांदगाव, कोंडये गावठण), सीताबाई शिंदे (कळसुली, बोर्डवे ग्रामपंचायत), वनिता पेडणेकर (नांदगाव, कोंडये गावठण). मालवण-स्नेहलता शिरवंडेकर (चौके क्र.१, नांदोस लक्ष्मीनारायण), आर्या मेस्त्री (आचरा क्र.२, मठबुद्रुक लिंग्रसवाडी), नूतन श्रावणकर (आचरा १, श्रावण परबवाडी), कुडाळ-अलका पाटकर (वालावल पाट), संजीवनी नाईक (माणगाव २, गोठोस देऊळवाडी), साक्षी साळगावकर (माणगाव १, आकेरी ग्रामपंचायत). वेंगुर्ले-विनया बोवलेकर (परुळे कर्ली), स्वराली नवार (तुळस, उभादांडा रामघाट), मनीषा दुधवडकर (परुळे कर्ली). सावंतवाडी-अनुष्का परब (आंबोली, चौकुळ गोणसाठवाडी), शीतल गावडे (निरवडे २, नेमळे गावडेवाडी), वेदांती गावडे (आंबोली चौकुळ गोणसाठवाडी). दोडामार्ग-तनुजा आरभावी (दोडामार्ग, आयी किटवाडी), आदिती देसाई (मोरगाव, भिकेकोनाळ).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.