54397
भोसले स्कूलचे विद्यार्थी
शिष्यवृत्ती परीक्षेत चमकले
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत सुयश प्राप्त केले. परीक्षेला शाळेतून शंभर विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये दुसरीची विद्यार्थिनी सान्वी पोरे हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
हर्ष गावडे (पहिली), सान्वी पोरे (दुसरी), मानस परब (दुसरी) आणि वेदा राऊळ (सहावी) यांनी सुवर्ण पदक मिळविले. प्रिश गोलघाटे (तिसरी) याने सिल्व्हर तर ओजस पालकर (दुसरी), धवल ठाकूर (दुसरी), अर्णव शेवाळे (तिसरी) आणि समृद्धी कुलांगे (सातवी) यांनी ब्राँझ मेडल मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अॅड. अस्मिता सावंत-भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक आणि मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.