-rat३०p२१.jpg-
२५N५४४५१
राजापूर : राजापुरात रंगपंचमी खेळताना तरुण.
----
राजापुरात रंगपंचमीने शिमगोत्सवाची सांगता
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः राजापुरात शनिवारी (ता. २९) फाल्गुन अमावस्येला शहरात रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या रंगपंचमी उत्सवाने तालुक्यातील शिमगोत्सवाचीही सांगता झाली.
दुपारी प्रथम राजमांडावर चव्हाटयाला रंग घातल्यांनतर शीळ गावच्या सिमेवरील म्हसोबा देवस्थानला रंग घालण्यात आला. त्यानंतर शहरात सर्वत्र रंगपंचमी साजरी करण्यात करण्यात आली. या रंगपंचमीने येथील शिमगोत्सवाची सांगता झाली. शहरात काही हौशी मुले आणि युवकांनी दुपारपासूनच एकमेकांना रंग लावण्यास सुरवात केली होती. एकमेकांच्या अंगावर रंग उडवत सणाचा आनंद लुटला. शहरात जवाहर चौक, बाजारपेठ, धोपेश्वरघाटी, भटाळी, खडपेवाडी, ओगलेवाडी, साखरकरवाडी, वरचीपेठ, तालीमखाना, गुरवाडी, पेट्रोलपंप या परिसरात मोठया उत्साहत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.