कोकण

जुवाठीत उभी राहिली पुस्तकांची गुढी

CD

काही सुखद--लोगो
-rat३०p२३.jpg-
२५N५४४५२
राजापूर : पुस्तक गुढीचे पूजन करताना महिला.
----
जुवाठीत उभी राहिली पुस्तकांची गुढी
शिक्षक गोंडाळ यांचा उपक्रम ; अक्षरमित्र चळवळीच्या प्रसारासाठी उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० : तालुक्यातील जुवाठी येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक बी. के. गोडाळ यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून जुवाठी येथील अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये पुस्तकांची अनोखी गुढी उभी केली.
ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती रुजण्यासाठी श्री. गोडाळ गेल्या काही वर्षापासून वाचनालय निर्मितीचा उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या या उपक्रमाची प्रेरणा घेऊन समाजातील अनेकांनी वाचनालय उभारणी केली आहे. काही समाजसेवकांनी या उपक्रमाला सहकार्यही केले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळाशाळामधून अक्षर सुधार उपक्रम घेत आहेत.
देशपातळीवर चालणाऱ्या स्पर्धा परीक्षेची प्राथमिक स्तरावर माहिती व्हावी, ग्रामीण भागातून जास्तीत जास्त प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्यासाठी त्यांनी जुवाठी येथे स्वखचनि अक्षरमित्र स्पर्धा परीक्षा केंद्राची उभारणी केली आहे. या उपक्रमांच्या जोडीने प्रामीण भागात सुरू केलेल्या अक्षरमित्र ग्रंथालय चळवळीचा अधिक प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने त्यांनी गुढीपाडव्याचे औचित्य साधून पुस्तकांची गुढी उभारली. मालती गोंडाळ, सुनंदा मयेकर, वनिता मयेकर, निरंजनी मयेकर, सत्यवती महंकाळ, चंद्रभागा मयेकर या महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन, तर राखी मयेकर, आदिती सूर्यवंशी, सिद्धी मयेकर, मधूरा तेली, कार्तिकी लेंबरकर, जागृती भांबळे या विद्यार्थिनींनी पुस्तक पूजन केले. श्री. गोडाळ यांनी पुस्तक वाचनाचे महत्व सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT