तुळस जैतीर देवाचा
बुधवारी वर्धापन दिन
वेंगुर्ले ः तुळस येथील श्री देव जैतीर देवाचा वर्धापन दिन सोहळा बुधवारी (ता. २) विविध कार्याक्रमांनी होणार आहे. सकाळी धार्मिक विधी, ८ वाजता लघुरुद्र, ९.३० वाजता श्रींची महापूजा, ८.३० वाजता श्री देव जैतीर पूजन, दुपारी १२.३० वाजता महाआरती, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४.३० वाजता जागृती, कस्तुरी, दिनेश तुळसकर, विजय तुळसकर यांचा सुगम संगीताचा बहारदार कार्यक्रम, ५.३० वाजता पंडित राजाराम आंबार्डेकर, बेळगाव यांचे नाट्य संगीत गायन, ७ वाजता अचानक भजन मंडळ वेंगुर्ले यांचे भजन, रात्री ८ वाजता तुळस गावातील प्रसिद्ध भजनी बुवांचे संयुक्त भजन, १० वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचे पौराणिक नाटक होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव जैतीर मंदिर देवस्थान मानकरी, तुळस गावातील ग्रामस्थ व देवस्थान उपसमितीने केले आहे.
---
माकडांच्या उपद्रवाने
मालवणवासीय त्रस्त
मसुरे ः संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या माकडांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून जिल्ह्यातील काही भागात वनविभागाने माकडे पकडण्याची मोहीम सुरू केली होती; मात्र मालवण तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही या मोहिमेअंतर्गत माकडे पकडण्याची कार्यवाही झाली नसल्याने येथील शेतकरी, ग्रामस्थ या मोहिमेच्या प्रतीक्षेतच आहे. सध्या मालवण तालुक्यात काळ्या व लाल तोंडाच्या माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही गावात माकडांच्या उपद्रवाने शेतकऱ्यांनी शेतीही करणे सोडून दिले आहे. शासन व वनविभागाने माकडे पकड मोहीम राबविली; मात्र अजूनही ग्रामीण भागात हे पथक पोहोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
......................
दाभोलीत १६ रोजी
महापुण्यतिथी उत्सव
वेंगुर्ले ः कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण ज्ञातीचे मूळ पीठ श्री मठ संस्थान दाभोली येथे प्रतिवर्षी होणारा श्री गुरू महापुण्यतिथी उत्सव १६ एप्रिलला पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. सर्व ज्ञातीबांधव व गुरुभक्तांनी या उत्सवास उपस्थित राहून गुरुसेवेचा लाभ घ्यावा. तसेच दरवर्षी होणारा सामुदायिक मौजीबंधन सोहळा यावर्षी ७ मे रोजी आयोजित केला आहे. इच्छुक ज्ञातीबांधवांनी श्री मठ संस्थान दाभोली ज्ञास कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
---
वेंगुर्लेत रविवारी
वधू-वर मेळावा
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग तालुके आणि गोवा विभागांच्या संयुक्त विद्यमाने वधू-वर पालक मेळाव्याचे आयोजन ६ एप्रिलला सकाळी ९.३० ते ३.३० दरम्यान वेंगुर्ले सुंदर भाटले साई मंगल कार्यालय येथे केले आहे. वधू-वरांनी बौद्ध असल्याचा दाखला, वयाचा पुरावा व शैक्षणिक पात्रता यांच्या झेरॉक्स व पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. विवाहोत्सुक वधू-वर व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.