-rat३०p२०.jpg-
२५N५४४५०
रत्नागिरी : माहेर संस्थेत रविवारी आयोजित गुढीपाडवा सणावेळी पुस्तकांच्या गुढीला नमस्कार करताना संस्थेतील अधिकारी, कर्मचारी.
---
माहेर संस्थेत एक तास वाचन उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : तालुक्यातील हातखंबा येथील माहेर संस्थेमध्ये वर्षातील सर्व सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. संस्थेत आज गुढीपाडव्यानिमित्त एक तास वाचन हा उपक्रम राबवण्यात आला आणि पुस्तकांची गुढी उभी करण्यात आली.
माहेर संस्थेमध्ये दाखल होणाऱ्या अनाथ, निराधार, मुले, मुली महिला व पुरुषांना कौटुंबिक वातावरणात सणाचा आनंद घेता यावा, यासाठी सर्व जाती धर्माचे सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात. संस्थेतील बालकांना पुस्तकांची ओळख व्हावी व वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या गुढीपाडवा सणाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे प्रकल्प प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाने पुस्तकांची गुढी व एक तास वाचन उपक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमात संस्थेचे प्रकल्प प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, सुनील कांबळे, अधिक्षिका शितल हिवराळे, विजया कांबळे, माधुरी पांचाळ, छाया दळवी, वृषभ खडसे, राकेश भिल्ल, अमित चव्हाण, अर्चना भिल्ल उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.