कोकण

नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रत्नागिरीत शोभायात्रा

CD

-rat३०p२६.jpg-
२५N५४४६८
रत्नागिरी ः शोभायात्रेत सहभागी सजीव देखावा.
------
नरेंद्राचार्य महाराज संस्थानची शोभायात्रा
हिंदू नववर्ष स्वागत ; सजीव देखाव्यांचे आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे आज हिंदू नववर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. लोकांचा सळसळता उत्साह, वाद्यांचा दणदणाट, डोक्यावर कलश घेतलेल्या महिला, ध्वजधारी महिला आणि पुरुष व शिस्त अशा थाटात निघालेल्या या चैतन्यदायी शोभायात्रेने रत्नागिरीकरांची सकाळ आनंददायी केली. या शोभायात्रेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही कौतुक केले.
रत्नागिरीसह महाराष्ट्रात ४५ शहरांत तर गोवा, गुजरात, तेलंगणा, मध्यप्रदेश छत्तीसगड, कर्नाटक या राज्यात मिळून ६२ शोभायात्रा आज काढण्यात आल्या. मराठी नववर्षाची सुरुवात होणारा हिंदूंचा हा महत्वाचा सण. त्यामुळे सर्वत्र हा सण उत्साहात साजरा झाला. त्यात जिल्हाभरातून आलेले स्वस्वरूप संप्रदायाचे लोक, नागरिक मोठ्यासंखेने व नटूनथटून सहभागी झाले होते. सकाळी सात वाजता मारूतीमंदिर चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणूक सुरू झाली. भारतीय संस्कृतीचे दर्शन त्यात घडविणारे अनेक चित्ररूप व सजीव देखावे सहभागी होते. त्यात समाजप्रबोधन करणारे, वैभवशाली इतिहासाला उजाळा देणारे, संतांची थोर परंपरा दाखवणारे देखावे होते. तसेच ढोल पथक, भजन, वाद्यवृंद सहभागी होता. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. वाटेत मिरवणुकीतील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून दुपारी श्रीराम मंदिर इथे सांगता झाली. तिथे पूजा, आरती झाली. श्रीराम मंदिर अध्यक्षा सौ. उर्मिला घोसाळकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case : नरेंद्र दाभोलकर हत्याकांडात मोठी अपडेट ! शरद कळसकरला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

1250 Range EV : एका चार्जवर मुंबई ते दिल्ली! 'या' कारने मार्केटमध्ये उडवली खळबळ; ९५५ हॉर्सपॉवरसह १२५० किमी रेंज, किंमत...

Latest Marathi News Live Update: बंगाल निवडणुकीत भाजपला मदत करण्यासाठी केंद्रीय दले कार्यरत: मतदान केल्यानंतर ममता यांचे विधान

Jamgaon News: डीजेच्या आवाजाने घाबरून पळालेल्या 27 बकऱ्या मॉर्निंग वॉककरांनी शोधून मालकाकडे सुपूर्द

Nitur Farmers:अनियमित वीजपुरवठ्यामुळे मांजरा नदीकाठची बागायती शेती धोक्यात

SCROLL FOR NEXT