-rat३०p१३.jpg-
२५N५४४२०
रत्नागिरी ः रत्नागिरीतील इफ्तार पार्टीला उपस्थित मंत्री उदय सामंत.
--
रत्नागिरीतील हिंदू-मुस्लिम ऐक्य आदर्शवत
मंत्री उदय सामंत ः सामंत प्रतिष्ठानतर्फे इफ्तार पार्टी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात हिंदू-मुस्लिम ऐक्य कसे आहे, हे आपण गणेशत्सवाच्या मिरवणुकी दरम्यान पाहिले आहे. गणेश मिरवणुकीचे स्वागत मुस्लिम धर्मियांकडून केले जाते. ईदी दिवशी हिंदू धर्मीय त्यांना शुभेच्छा देतात. हे हिंदू-मुस्लिम ऐक्य सर्वांनी टिकवून ठेवले पाहिजे. मी परंपरा जपणारा लोकप्रतिनिधी आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून ईदीच्या शुभेच्छा देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
शनिवारी (ता. २९) शहरातील जयेश मंगल पार्क येथे उदय सामंत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित इफ्तार पार्टीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अलिमियाँ काझी, डॉ. अलिमियाँ परकार, डॉ. मतिन परकार, उद्योजक नजिर नाईक, डॉ. म्हस्कर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, अजिम चिकटे, अल्ताफ संगमेश्वरी आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्याने उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले, आज मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जातात, त्यावर आपण सर्वजण विश्वास ठेवतो. मात्र त्यातील सत्यता तपासली जात नाही. कोरोना काळात आपण शहरातील परकार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. त्यावेळी डॉ. परकार हे आलेला रुग्ण हिंदू आहे की मुस्लिम हे पहात नव्हते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.