कोकण

गोमांस वाहतूक प्रकरणी ‘त्या’ संशयितास कोठडी

CD

गोमांस वाहतूक प्रकरणी ‘त्या’ संशयितास कोठडी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः गोमांस वाहतूक प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी मोहम्मद सर्फराज भाऊद्दीन ख्वाजा (वय ४५, रा. सावंतवाडी बाहेरचावाडा) याच्यावर काल (ता.२९) रात्री उशिरा अटकेची कारवाई केली. त्याला आज सकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
माडखोल येथे हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काल ख्वाजा याला त्याच्या मोटारीतून गोमांसाची अवैध वाहतूक करत असताना त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली २ लाख रुपये किंमतीची मोटार, १० हजारांचा मोबाईल, ३३ हजार रुपये रोख रक्कम आणि ३८ हजार ११५ रुपये किंमतीचे गोमांस असा एकूण २ लाख ८१ हजार ११५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी ख्वाजा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यानंतर आज त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी न्यायालयात संशयिताने हे मांस कुठून आणले? आणि या गुन्ह्यात त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का? याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने संशयिताला २ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजी राजं म्हणायचं', 'राजा शिवाजी'मधील सलमान खान प्रेक्षकांना प्रचंड भावला, शत्रूंना म्हणाला...

New Rule: 1 मेपासून पैशांशी संबंधित मोठे बदल! ATM, UPI, गॅस सिलिंडर ते क्रेडिट कार्ड; काय बदलणार, काय महागणार?

Akola News: जिल्ह्यातील तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित;पाच केंद्रांना नोटीस; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

SCROLL FOR NEXT