-rat३०p३६.jpg-
२५N५४४९९
समृद्धी नार्वेकर
-----
राजापूरची सुकन्या झाली न्यायाधीश
समृद्धी नार्वेकर ; आजीकडून घेतली प्रेरणा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३० ः राजापुरातील समृद्धी प्रशांत नार्वेकर या तरुणीने बारावीनंतर कोल्हापूरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये पाच वर्षे बॅचरल ऑफ सोशल लॉ (बीएसएलएलएमबी) चे शिक्षण घेतले. पुढे दोन वर्षात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. राजापुर तालुक्यातून न्यायाधीश होणारी ती पहिली तरुणी ठरली आहे.
या परीक्षेसाठी बसलेल्या ११४ विद्यार्थ्यांमध्ये समृद्ध हिने राज्यात तिसावा आणि मुलाखतीमध्ये ५० पैकी ३५ गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. राजापुरातील प्रसिद्ध सुवर्णकार असलेल्या प्रशांत व सौ. प्रेरणा नार्वेकर यांची समृद्धी ही मुलगी आहे. समृद्धी हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण राजापुरात झाले. राजापुरातील नॅशनल इंग्लिश स्कूलमधून ती दहावी झाली. त्यानंतर ती नवजीवन कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी परीक्षा उतीर्ण झाली. त्यानंतर तिने कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये पाच वर्षे बॅचरल ऑफ सोशल लॉ साठी प्रवेश घेतला. या ठिकाणी पाच वर्षे शिक्षण घेत ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. त्यानंतर ती दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षेसाठी तयारी करत परीक्षा दिली होती. या कालावधीत तिने राजापुरातील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. मिलिंद चव्हाण यांच्याकडे क्रिमनल केससाठी प्रॅक्टीसही केली. प्रारंभी प्री प्रिलियम त्यानंतर मेन्स व त्यानंतर मुलाखत अशा परीक्षा दिल्या होत्या. तिने दिलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात समृद्धीने बाजी मारली.
समृद्धी हिची आजी म्हणजे आईची आई श्रद्धा रांगणेकर या न्यायाधीश होत्या. त्या जिल्हा न्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांची प्रेरणा घेत आपण याच क्षेत्रात करिअर करायचे असे सुरवातीपासूनच निश्चित केले होते, असे समृद्धीने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.